Salaar Worldwide Box Office Collection : गेल्या काही वर्षांमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीने बॉलिवूडला अनेक बाबतीत मागे टाकले आहे. याची सुरुवात 'रिबेल स्टार' प्रभासने 'बाहुबली' सिनेमातून केली. यानंतर परत एकदा 'सालार'द्वारे प्रभासने मोठा पराक्रम केला आहे. या चित्रपटाने जगभरात 700 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
'डंकी' पडला मागे प्रभासचा 'सालार' आणि शाहरुख खानचा 'डंकी' सोबत रिलीज झाला होता. शाहरुखसमोर प्रभासचा चित्रपट चालेल, असा कुणी विचरही केला नव्हता. मात्र, प्रभासच्या चित्रपटाने बाजी मारली. भारतात सालारच्या व्यवसायाची गती थोडी मंदावली, परंतु जगभरातील कलेक्शन वेगाने वाढतंय. रिलीजच्या 20 दिवसांत या चित्रपटाने 700 कोटींचा टप्पा ओलांडला असून, आता 750 कोटींकडे कुच केली आहे. तर, डंकीने आतापर्यंत सुमारे 452 कोटी रुपये कमावले आहेत.
सालारची कथा...सालारची कथा खानसार नावाच्या काल्पनिक शहरावर आधारित आहे. हा चित्रपट देवा (प्रभास) आणि वर्धा (पृथ्वीराज) या दोन मित्रांभोवती फिरतो. वर्धा एक राजकुमार असून, देवा त्याच्यासाठी काम करतो आणि दोघांमध्ये घट्ट मैत्रीही आहे. 'प्रभासने सालार: भाग 1- सीझफायर'मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, ईश्वरी राव, श्रिया रेड्डी, टिनू आनंद आणि जगपती बाबू यांच्याही भूमिका आहेत.