Join us

सखी, स्वानंदीची दोस्ती

By admin | Updated: March 18, 2015 23:04 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांची पुढची पिढी आज चित्रपटसृष्टीत येऊन चांगलीच स्थिरावली आहे. मग त्यात मराठी चित्रपटसृष्टी तरी कशी मागे राहील!

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गज कलाकारांची पुढची पिढी आज चित्रपटसृष्टीत येऊन चांगलीच स्थिरावली आहे. मग त्यात मराठी चित्रपटसृष्टी तरी कशी मागे राहील! प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी सखी आणि उदय टिकेकर-आरती अंकलीकर-टिकेकर यांची मुलगी स्वानंदीने आता अभिनयाच्या प्रांतात उडी घेतली आहे. सहा मित्रांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेत त्यांच्या भूमिका आहेत. मात्र यांची दोस्ती आजच्या तरुणाईला आवडते का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.