Join us

सैफ एक महिन्याच्या पॅटर्निटी लिव्हवर...

By admin | Updated: December 25, 2016 04:02 IST

क रिना कपूर खान ही मुलगा तैमूर अली खानसह घरी केव्हा येणार? अशी उत्सुकता खान आणि कपूर कुटुंबियांना लागलेली असतानाच सैफ अली खानने मुंबईच्या ब्रीच क्रँडी

क रिना कपूर खान ही मुलगा तैमूर अली खानसह घरी केव्हा येणार? अशी उत्सुकता खान आणि कपूर कुटुंबियांना लागलेली असतानाच सैफ अली खानने मुंबईच्या ब्रीच क्रँडी रूग्णालयात जाऊन पत्नी करिना आणि मुलगा तैमूरला सुखरूप घरी आणले. तैमूरचे घरी आगमन झाल्यानंतर खान कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाळ तैमूर घरी आल्यावर सैफला आता त्याला सोडून बाहेर जाणे नकोसे होऊ लागले. म्हणून त्याने शूटिंगपासून सुट्टी आणि जास्तीत जास्त वेळ पत्नी करिना आणि तैमूरसोबत वेळ घालवण्यासाठी एक महिन्याची पालकत्व रजाच घेतली आहे. सैफ अली खानचा तैमूर हा तिसरा मुलगा. पहिली पत्नी अमृता सिंगपासून त्याला सारा आणि इब्राहीम ही दोन मुलं आहेत. मात्र, सैफ सध्या प्रचंड आनंदात आहे. बाळ तैमूर घरी आल्यापासून त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असे सैफला वाटते आहे. त्याच्या वांद्रे येथील घरी तो करिना आणि तैमूरसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणार आहे, असे त्याने जाहीर केले आहे. मात्र, जानेवारी मध्यापासून तो पुन्हा त्याच्या कामात बिझी होणार आहे. हॉलिवूड चित्रपट ‘शेफ’ याच्या हिंदी रिमेकसाठी त्याला शूटिंग सुरू करायची आहे. पण, तोपर्यंत जास्तीत जास्त वेळ आपण तैमूरसोबत घालवावा, एवढीच त्याची इच्छा आहे.’