Join us
Daily Top 2Weekly Top 5

विरानुष्काचा रोमँटिक हॉलिडे

By admin | Updated: November 25, 2015 01:29 IST

हॉट कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यांचे चाहते त्यांना विरानुष्का म्हणून ओळखतात. मग कधी टीका होते तर कधी दोघे एकमेकांसोबत किती ग्रेट दिसतात अशी स्तुती

हॉट कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यांचे चाहते त्यांना विरानुष्का म्हणून ओळखतात. मग कधी टीका होते तर कधी दोघे एकमेकांसोबत किती ग्रेट दिसतात अशी स्तुती. आणि दोघेही मीडियापासून लपून राहत नसल्यामुळे ते मीडियाचे लाडके लव्हबर्डस् आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांतून ब्रेक घेतला होता. यावेळी त्यांच्यासोबत शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशासुद्धा होते. या विकेंडला ते परत मुंबईला आले. यावेळी फॅन्सने एअपोर्टमधून बाहेर पडतानाचे त्यांचे फोटो ट्विटरवर अपलोड केले. विराट कॅज्युअल ड्रेसमध्ये तर अनुष्काने पूर्णलांंबीचा कुर्ता घातलेला होता. या हॉलीडेनंतर दोघेही परत आपापल्या कामात व्यस्त झाले. टेस्ट मॅचसाठी विराट नागपूरला तर अनुष्का ‘ऐ दिल है मुश्किल’च्या शुटिंगसाठी लंडनला गेली.