Join us

प्रियंकासोबत सैफ करणार रोमान्स

By admin | Updated: October 20, 2014 02:02 IST

बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोपडा हिच्यासोबत सैफ अली खान हा पडद्यावर रोमान्स करण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी या जोडीने एकाही चित्रपटात सोबत काम केले नव्हते.

बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोपडा हिच्यासोबत सैफ अली खान हा पडद्यावर रोमान्स करण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी या जोडीने एकाही चित्रपटात सोबत काम केले नव्हते. प्रभुदेवा सध्या अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांना घेऊन ‘अ‍ॅक्शन जॅक्सन’ या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. या चित्रपटाची शूटिंग शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानंतर प्रभुदेवा लगेचच नव्या चित्रपटाचे काम हाती घेईल. या चित्रपटासाठी त्याने प्रियंका आणि सैफ यांची नावे निश्चित केल्याची चर्चा आहे. सैफ आणि प्रियंका यांचा आगामी चित्रपट हा अ‍ॅक्शन चित्रपट असेल; परंतु याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. प्रियंका आणि सैफची पत्नी करिना यांच्यातील संबंध कायम तणावाचे असतात. ‘ऐतराज’नंतर या दोघींनी कोणत्याही चित्रपटात एकत्रित काम केले नाही. प्रभुदेवाच्या चित्रपटामुळे प्रियंका आणि करिना यांच्यातील मतभेद कमी होण्याची शक्यता आहे.