मा जी क्रिकेट कॅप्टन मोहंमद अझहरुद्दीनची पहिली बायको नॉरीनची भूमिका करणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते, अशी कबुली अभिनेत्री प्राची देसाई हिने दिली आहे. ती म्हणते की, ‘नॉरीनविषयी कुणाला माहिती असेल असे मला तरी नाही वाटत. त्यामुळे तिची भूमिका साकारणे माझ्यासाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. तिच्याबद्दल आॅनस्क्रीन पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटात दाखवले जात असणार याबाबत काही शंका नाही. ‘अजहर’च्या टीमने लंडन येथे शूटिंग सुरू केले आहे. ती लवकरच चित्रपटाच्या टीमला जॉईन होणार आहे. नॉरीनपासून वेगळे होऊन त्याने संगीता बिजलानीसोबत लग्न केले आणि तिच्यापासूनही घटस्फोट घेतला.
‘अजहर’मधील भूमिका आव्हानात्मक
By admin | Updated: August 2, 2015 23:59 IST