Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहन करतोय ‘अ‍ॅक्टिव्ह पॅसिव्ह’ लघुपटात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 02:29 IST

‘हो णार सून मी या घरची’ या मालिकेतील पिंट्या या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या रोहन गुजरने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे

‘हो णार सून मी या घरची’ या मालिकेतील पिंट्या या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या रोहन गुजरने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे आणि या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरअंतर्गत ते एका लघुपटाची निर्मिती करत आहेत. ‘धुम्रपान’ या मुद्यावर आधारित ‘अ‍ॅक्टिव्ह पॅसिव्ह’ अशी शॉर्टफिल्म रोहनच्या प्रोडक्शन हाऊसने बनवली असून यात तो स्वत: अभिनयही करणार आहे. या शॉर्टफिल्ममध्ये आकांक्षा गाडे असेल. आकांक्षा सध्या ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेत काम करतेय. या लघुपटाविषयी रोहन सांगतो, ‘धुम्रपान करणे हे शरीरास घातक आहे, हे माहीत असूनही लोक धुम्रपान करतात आणि त्यातही सिगारेटच्या धुराचा केवळ त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. धुम्रपान या विषयावर पाच मिनिटांचा ‘अ‍ॅक्टिव्ह पॅसिव्ह’ हा लघुपट असून स्मोकिंग किल्स हा संदेश आम्ही यामार्फत देण्याचा प्रयत्नकरणार आहोत. या लघुपटासाठी प्रमोशनल साँग आम्ही बनवले आहे. ‘इंडियन आयडॉल’ फेम आदिती पॉलने हे गाणे गायले असून हे एक लव्ह साँग आहे. स्मोकिंगच्या संदर्भातील हे लव्ह साँग रसिकांना आवडेल, अशी मला खात्री आहे. अ‍ॅक्टिव्ह पॅसिव्ह हा लघुपट आम्ही युट्युबवर लाँच केले असून हे साँग आम्ही १४ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन दिनाच्या निमित्ताने रिलीज करणार आहोत.’