Join us

रितेशच्या बँक चोरचे शूटिंग सुरू

By admin | Updated: October 11, 2014 04:46 IST

यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या बँक चोर या चित्रपटाचे शूटिंग मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू झाले आहे.

यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या बँक चोर या चित्रपटाचे शूटिंग मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात रितेश देवावर विश्वास असलेल्या एका मराठी तरुणाच्या भूमिकेत असून, बँकेचे कर्ज न फेडू शकल्याने मित्रांच्या मदतीने बँक लुटण्याची योजना तो बनवतो. दुसरीकडे विवेक ओबेरॉय वर्षभरानंतर चित्रपटात दिसणार असून तो एका सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रितेशने सांगितले की, त्याने लहानपणी स्केच पेन चोरले होते, तसेच शाळेमध्ये मित्रांचा डबा चोरून तो खात असे.