Join us

OMG!! याला झाले तरी काय? रितेश देशमुखचा नवा लूक पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:30 IST

होय, रितेश व जेनेलिया अशा काही अवतारात दिसले की, पाहणारे सगळेच चक्रावले.

ठळक मुद्दे लवकरच रितेश देशमुख लवकरच ‘बागी 3’ चित्रपटात झळकणार आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्यातील प्रेम, एकमेकांसोबतची केमिस्ट्री सगळ्यांनाच ठाऊक आहे. रिलेशनशिपच्या बाबतीत या जोडप्याला तोड नाही. फॅशनच्या बाबतीतही हे कपल इतरांपेक्षा कमी नाही. होय, अलीकडे रितेश व जेनेलिया अशा काही अवतारात दिसले की, पाहणारे सगळेच चक्रावले. विशेषत: रितेशचा नवा लूक पाहून सगळेच थक्क झालेत.तर निमित्त होते, ‘कुली नंबर 1’च्या रॅप अप पार्टीचे. होय, या रॅप अप पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. रितेश व जेनेलियाही या पार्टीला पोहोचले. पण या जोडप्याने एन्ट्री घेताच सगळ्यांच्या नजरा दोघांवर खिळल्या.

होय, रितेशकडे तर सगळे बघतच राहिले. त्याची आर्मी कट हेअरस्टाईल आणि सोबत केसांना व्हाईट रंग अशा अवतारात तो दिसला. आधी कधीच रितेशला लूकसोबत अशाप्रकारे एक्सपीरिमेंट करताना बघितले गेले नाही. त्यामुळे त्याचा हा नवा लूक पाहून सगळेच अवाक् झालेत.

जेनेलियाही या पार्टीत ग्लॅमरस अवतारात दिसली. कॉटन फॅब्रिकची व्हाईट ब्लॅक चेक्सची शॉर्ट्स आणि सोबत व्हाईट शर्ट असा तिचा अंदाज होता. दोघांनीही एकत्र अशा पोज दिल्यात.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर लवकरच रितेश देशमुख लवकरच ‘बागी 3’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर व अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जेनेलियाचे म्हणाल तर सध्या ती चित्रपटांपासून लांब राहत आपल्या कुटुंबाला वेळ देतेय. पण अलीकडे तिच्याही कमबॅकच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजा