Join us

रितेश- जेनेलियाला 'पुत्र'रत्नाचा लाभ

By admin | Updated: November 26, 2014 08:58 IST

बॉलिवूडचे सुपरक्युट कपल अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया यांना 'पुत्र'रत्नाचा लाभ झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २६ - बॉलिवूडचे सुपरक्युट कपल अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया यांना 'पुत्र'रत्नाचा लाभ झाला आहे. खुद्द रितेशनेेच ट्विटरवरून ही गुड न्यूज दिली आहे. 

बाळाची चाहूल लागल्यापासून रितेश जेनेलियाला खूप जपताना, तिची काळजी घेताना दिसत होता. सलमान खानची बहीण अर्पिता हिच्या रिसेप्शनसाठी ही क्युट जोडी उपस्थित होती. त्यावेळीही रितेश जेनेलियाची काळजी घेताना दिसला. आणि आता तर त्यांनी ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर करत आनंद द्विगुणित केला आहे.