Join us

​ऋषी कपूर आता ‘किम’वर घसरले!!

By admin | Updated: August 9, 2016 10:31 IST

अभिनेते ऋषी कपूर यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियनची तुलना कांद्याच्या पोत्याशी केली आहे.

मुंबई, दि. ९ -  बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर हे त्यांच्या अनेक विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर अफलातूनच म्हणायला हवा, नाहीतर सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार जोक्स मारताना ते दिसले नसते. त्यांचे हे जोक्स अनेकदा वादग्रस्त ठरलेत. पण ऋषी कपूर यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. 

आता तर ऋषी कपूर यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन हिला टार्गेट करत तिची खिल्ली उडवली आहे. ऋषी यांनी किम आणि कांद्याचे पोते असा एक फोटो पोस्ट करत किमची तुलना कांद्याच्या पोत्याची तुलना केली आहे. हाफोटो पाहिल्यावर सगळा मामला तुमच्या लक्षात येईलच.