Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये अशाप्रकारे रिंकू राजगुरू घालवतेय वेळ, तिच्या लाडक्या मांजरीसोबत केला फोटो पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 17:00 IST

रिंकूने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत ती लॉकडाऊनमध्ये सध्या काय करत आहे हे सांगितले आहे.

ठळक मुद्देसैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर करत ती लॉकडाऊनमध्ये सध्या काय करत आहे हे तिने सांगितले आहे.

रिंकूने पोस्ट केलेल्या फोटोत ती पुस्तक वाचताना दिसत असून एक गोंडस मांजर तिच्या मांडीवर दिसत आहे. रिंकूचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ पाच तासांत 44 हजाराहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला असून सामान्यांसोबत सेलिब्रेटींनी देखील या फोटोवर कमेंट केली आहे. प्रार्थना बेहेरेने सो क्यूट असे लिहिले आहे. 

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी तिचा अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने काहीच दिवसांपूर्वी लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे. छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. तसेच रिंकू झुंड हिंदी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :रिंकू राजगुरू