Join us  

नाईट लाईफ विषयी रिंकू राजगुरूचं " हे " उत्तर ऐकून तुम्हाला बसेल शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:07 PM

रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदागिरकर यांचा '' मेकअप '' चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय..

ठळक मुद्देगेला महिनाभर नाईट लाईफ विषयी जोरदार चर्चा

पुणे:  आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड गदारोळानंतर मुंबईत २६ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरु झाली.शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंच्या स्वप्नातला एक प्रोजेक्ट सत्यात उतरला. अर्थात नाईट लाईफच्या निर्णयावर अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया सर्वच वयोगटातून समोर आल्या. पण लाखों तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेल्या या सैराट फेम आर्चीला अर्थात रिंकू राजगुरूला जेव्हा नाईट लाईफविषयी तिचं मत विचारलं तेव्हा तिच्या उत्तराने उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती म्हणाली, नाईट लाईफ म्हणजे काय? ते मला माहित नाही. रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदागिरकर यांचा '' मेकअप '' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर पत्रकार भवन येथे दाखवण्यात आला. त्यावेळी आयोजित पत्रकार एक पत्रकाराने रिंकूला नाईट लाईफबद्दल विचारले असता. रिंकू म्हणाली, नाईट लाईफ म्हणजे काय असते हे मला माहित नाही. परिषदेला लेखक आणि दिग्दर्शक गणेश पंडित उपस्थित होते.

काही दिवसापूर्वी मेकअप चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. यामध्ये रिंकू ची दोन वेगळी रूपे आहेत. त्यामुळे तिचा डबल रोल आहे का ही चर्चा सुरू होती. टिझर आणि ट्रेलर नंतर मेकअपचा खरा उलघडा झाला. पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीने हा मेकअप का केला असे प्रश्न ट्रेलर पाहिल्यावर उपस्थित होत आहेत. परंतु चित्रपटातील गाणी अतिशय उत्तम आहेत. त्यापैकी गाठी ग हे गाणे प्रदर्शित झाले असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  नाईट लाईफबद्दल बोलताना रिंकू म्हणाली, नाईट लाईफ म्हणजे काय असते. त्याबद्दल मी कधी ऐकले नाही. मला हे प्रकरणच माहीत नाहीये. अशा वेळी रिंकूला सावरताना चिन्मय ने उत्तर दिले. तो म्हणाला, आपल्या चित्रपटात एक रात्रीचा प्रसंग आहे. त्या प्रसंगात सर्वत्र लाईट लावली आहे. नागरिक ते पाहण्याचा आनंद घेत आहेत. असे रिंकू ला नाईट लाईफबद्दल सांगितले.

टॅग्स :रिंकू राजगुरूसिनेमामेकअपनाईटलाईफआदित्य ठाकरे