Join us

पोस्टर बॉयज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:47 IST

‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटाची सुरुवातीला मराठीत निर्मिती करण्यात आली आहे. मराठी प्रेक्षकांनी त्यावेळेस चित्रपटाला चांगला प्रतिसादही दिला होता.

Release Date: September 08, 2017Language: हिंदी
Cast: सनी देओल, श्रेयस तळपदे, बॉबी देओल
Producer: सोनी पिक्चर्स नेटवर्क्स प्रॉडक्शनDirector: श्रेयस तळपदेने
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
चित्रपटाची कथा एका छोट्या गावात राहणा-या अशा तीन पुरुषांवर आधारित आहे ज्यांचे आयुष्य एका दिवसातच पूर्णत: बदलले जाते. एक दिवस अचानकच त्यांना माहिती होते की, आरोग्य विभागाने त्यांच्या गावात नसबंदीचे पोस्टर लावले असून, पोस्टर्सवर तिघांचेही फोटो झळकत आहेत. शिवाय ‘आम्ही नसबंदी केली तुम्ही केव्हा करणार’ असा संदेश हे तिघे देत असल्याचे पोस्टर्सच्या माध्यमातून देण्यात आला आहे.त्यामुळे या तिघांच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते.