Join us

‘नटसम्राट’चा रिमेक गुजरातीत

By admin | Updated: October 8, 2016 01:31 IST

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ सिनेमाचा आता गुजरातीत रिमेक बनवण्यात येणार आहे

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ सिनेमाचा आता गुजरातीत रिमेक बनवण्यात येणार आहे. मराठीत नटसम्राटने बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करून साऱ्यांची मनं जिंकली होती. यात नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीत नटसम्राट सुपरहिट ठरला. हीच लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी श्री अष्टविनायक चित्र बॅनरअंतर्गत गुजराती भाषेत या सिनेमाचा रिमेक बनविण्यात येणार असल्याचे समजतेय. जयंत गिलाटर सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून, सिनेमात कलाकार कोण असणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे.