Join us

वयाची ६० पार केलेली रामायणातील सीता आता दिसते अशी, फोटो पाहूनही बसणार नाही विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 15:21 IST

दीपिका यांनी नेहमीच करिअर आधी त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिले आहे.

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना त्यांच्या नावाने कमी पण सीता या भूमिकेमुळे सारेच लोकं ओळखतात. दीपिका चिखलिया सध्या खूप चर्चेत आहेत. कारण आता पुन्हा एकदा रामायण सुरू होणार असल्यामुळे रामायणातील प्रत्येक पात्र पुन्हा एकदा रसिकांच्या जुन्या आठवणींना ऊजाळा देणार आहेत. दीपिका चिखिलिया आता ६४ वर्षाच्या झाल्या आहेत. मात्र तरीही आजच्या अभिनेत्रींना लाजवेल असे त्यांचे सौंदर्य आजही आबाधित आहे. या वयातही दीपिका खूप फिट दिसतात.

यामागे नियमित योगा आणि योग्य डाएट फॉलो करणे हेच रहस्य आहे.तसेच दीपिका यांना सोशल मीडियावर वेळ घालवयलाही खूप आवडते. त्यामुळे त्या सतत सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे एक से बढकर एक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांसह संपर्कही साधत असतात. 

तसेच चाहत्यांच्याआग्रहास्तव आणि त्यांचे लोकप्रियता पहाता त्यांनी  'छुटा छेडा' या गुजराती मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले होते. सुमारे 25 वर्षांचा काळ मला कमबॅकसाठी लागला.  दीपिका या सुरूवातीपासून कामाला घेऊन खूप सिलेक्टीव्ह राहिल्या आहेत. मनापासून भूमिका आवडली तर ती ऑफर त्या स्विकारतात हाच नियम त्यांनी पाळला आहे. त्यामुळेच की काय, अगदी कमी प्रोजेक्टमध्ये आपल्याला दीपिकाचे दर्शन घडते. दीपिका यांनी काही मालिकेत काम केले.

त्यानंतर एका कॉस्मेटिक कंपनीचे मालक हेमंत टोपीवाला यांच्याशी लग्न झाल्यानंतर दीपिका यांनी स्वतःहून इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. मनोरंजन ही स्ट्रीम सोडल्यानंतर दीपिका यांनी आपल्या व्यवसायात पतीची मदत केली. अभिनेत्री दीपिकाला दोन सुंदर मुली आहेत निधी आणि जुही. दीपिका यांनी नेहमीच करिअर आधी त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्या संसारात रमल्या आणि या झगमगाटाच्या दुनियेपासून लांब जात आपले क्वॉलिटी टाईम एन्जाय करण्यात बिझी झाल्या. आता पुन्हा एकदा ८० च्या दशकातील रामायण सुरू होणार म्हटल्यावर नव्या पिढीलाही तो काळ अनुभवण्याची आणि रामायण समजून घेण्याची पर्वणीच मिळणार हे मात्र नक्की. 

टॅग्स :रामायण