Join us

या कपल्सचे नाते ब्रँजेलिनापेक्षा मजबूत!

By admin | Updated: September 24, 2016 02:06 IST

हॉलीवूडमधील सर्वांत पॉवरफुल कपल अशी बिरुदावली मिरवणारे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली विभक्त होत असताना, दीर्घकाळ लग्न टिकवून असलेल्या जोडप्यांचा ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा

हॉलीवूडमधील सर्वांत पॉवरफुल कपल अशी बिरुदावली मिरवणारे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली विभक्त होत असताना, दीर्घकाळ लग्न टिकवून असलेल्या जोडप्यांचा ‘सीएनएक्स’ने घेतलेला आढावा...ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोलीबारा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. ‘हॉलिवूड रॉयल कपल’, ‘पॉवरफुल कपल’, ‘प्रेमाचे आदर्श उदाहरण’ असे त्यांच्याबद्दल म्हटले जायचे. परंतु दोन वर्षांत त्यांचे लग्न तुटले. २०१६ हे वर्ष तर अनेक हॉलिवूड-बॉलिवूड जोडप्यांचे घटस्फोट आणि ब्रेकअप्सने गाजले. जॉनी डेप, हृतिक, फरहान अख्तर, टेलर स्वीफ्ट अशी किती तरी नावे घेता येतील. मग हे पाहून प्रश्न पडतो, की सेलिब्रेटींचे नाते खरंच आपण जितके ऐकतो, पाहतो तेवढे कमकुवत आणि अल्पायुषी आहे का? म्हणून आम्ही शोध घेतला दीर्घकाळ लग्न टिकवलेल्या प्रसिद्ध सेलिब्रेटींचा. कोण आहेत ते सेलिब्रेटी? जॉन ट्रॅव्होल्टा आणि केली प्रेस्टन१९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ग्रीझ’ सिनेमात जॉन ट्रॅव्होल्टाला पाहिल्यानंतर केलीने आपल्या डान्स शिक्षकाला म्हटले होते की, एके दिवशी मी जॉनशी लग्न करणार आणि १९८९ साली ‘द एक्स्पटर््स’मध्ये काम केल्यावर दोघांच्या प्रेमाची सुरुवात झाली आणि १९९१मध्ये ते विवाह बंधनात अडकले. आयुष्याच्या अनेक चांगल्या-वाईट टप्प्यावर आम्ही एकमेकांना साथ देतो असे तो म्हणतो.विल स्मिथ आणि जेडा पिकेंट-स्मिथजेडाने १९९४ मध्ये विल स्मिथ स्टारर ‘द फ्रेश प्रिन्स आॅफ बेल-एअर’ मालिकेसाठी त्याच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेसाठी आॅडिशन दिली होती. भूमिकेसाठी जरी तिची निवड झाली नसली तरी खऱ्या आयुष्यात ती स्मिथची पत्नी बनली. १९९७मध्ये त्यांचे लग्न झाले. दोन मुलांसोबत त्यांचा संसार एकदम छान सुरू असल्याचे दोघांनी वेळोवेळी बोलून दाखविले.टॉम हँक्स आणि रिटा विल्सन‘फॉरेस्ट गप्म’, ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ अशा ब्लॉकबस्टर सिनेमांत काम केलेल्या टॉम हँक्सला आपण ‘दा विंची कोड’ आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘इनफर्नो’साठी ओळखतो. टॉम आणि रिटाची भेट ‘बुझम फ्रेंड’ मालिकेच्या सेटवर झाली होती आणि १९८८मध्ये त्यांनी लग्न केले. टॉम म्हणतो, ‘रिटाने खऱ्या अर्थाने मला प्रेम म्हणजे काय असते हे शिकवले.’शाहरूख खान आणि गौरी खानशाहरूख-गौरीची लव्हस्टोरी त्याच्या चित्रपटांपेक्षा कमी इंटरेस्टिंग नाही. तो बॉलीवूडमध्ये येण्याआधीपासून दोघांचे निस्सिम प्रेम होते. कॉलेज जीवनातील या प्रेमीयुगलाने घरच्यांच्या विरोधाला समर्थनात रूपांतरित करून १९९१ साली लग्न केले. बॉलीवूडमधील आदर्श कपल आणि पालक म्हणून दोघांकडे पाहिले जाते.सॅम्युएल एल. जॅक्सन आणि लाटान्या रिचर्डसनभारतीय प्रेक्षकांना सॅम्युएल एल. जॅक्सन ‘अ‍ॅव्हेंजर्स’, ‘आयर्नमॅन’, ‘कॅप्टन अमेरिका’ अशा चित्रपटांत निक फ्युरीच्या भूमिका माहीत असतील. विद्यापीठात शिकत असताना १९७४ साली त्याची भेट लाटान्याशी झाली आणि दोघांनी १९८०मध्ये लग्न केले. दोघांचाही संसार ३६ वर्षांनंतरही सुरळीत आहे.