Join us  

रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपवर कतरिना कैफची प्रतिक्रिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 12:41 PM

दोघांच्या या नात्याबाबत सर्वातआधी रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड दीपिका पदुकोनला माहिती होती असेही बोलले जाते.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या रिलेशनशिपची चर्चा जोरदार रंगलीये. एका मुलाखतीत रणबीरनेच याचा खुलासा केलाय. दोघांच्या या नात्याबाबत सर्वातआधी रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड दीपिका पदुकोनला माहिती होती असेही बोलले जाते. आता त्यांची दुसरी एक्स गर्लफ्रेन्ड कतरिना कैफने दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिल्याचं बोललं जात आहे. 

खरंतर कतरिना कैफने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यात लिहिले आहे की, 'मी यावर तेव्हाच विश्वास ठेवेन जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी बघणार. किंवा मी ते तेव्हाच बघणार जेव्हा त्यावर विश्वास ठेवेल'. 

 

कतिरनाने या मेसेजमध्ये कुणाचही नाव घेतलं नाहीये. पण कतरिनाने ही पोस्ट रणबीर-आलियाच्या नात्यासंबंधी लिहिली आहे अशी चर्चा होतीये. करितनाने ही पोस्ट कतरिना कैफ ऑनलाइन नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. आता कतरिनाने हे सहज शेअर केलंय की आणखी कशावरुन हे काही अधिकृतपणे समोर आलेलं नाहीये. पण तिच्या पोस्टवर अनेकजण हेच म्हणताहेत की, तिने रणबीर आणि आलियाच्या नात्याबाबतच हे शेअर केलंय.

दरम्यान, रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी 2009 मध्ये अजब प्रेन की गजब कहाणी या सिनेमावेळी एकमेकांना डेट करणं सुरु केलं होतं. तब्बल 6 वर्षांनी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. 

टॅग्स :कतरिना कैफरणबीर कपूर