Join us

सुशांत आत्महत्या प्रकरणी रियावर FIR दाखल झाल्यानंतर अंकिता लोखंडेने दिली ही रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 18:42 IST

सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाने एक वेगळंच वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आता नवीन वळण आले आहे. सुशांतच्या वडिलांनी त्याच्या निधनाला दीड महिना उलटल्यानंतर मोठा खुलासा केला आहे. त्याच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या विरोधात पटनामध्ये एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात रियाचे नाव समोर आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.

आता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले की, सत्य जिंकते. अंकिताने सुशांत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नाव समोर आल्यावर ही पोस्ट केली. अंकिताची ही पोस्ट सुशांतच्या मृत्यूच्या तपासाकडे इशारा करत आहे. तिच्या या पोस्टवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की सत्याचाच नेहमी विजय होतो. 

अलीकडेच सुशांतचे वडील के के सिंह यांनी एफआयआर दाखल करून रिया आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

सुशांतचे वडील म्हणतात की, रियाने फक्त आपल्या मुलाची मानसिक स्थिती बिघडविली आणि ड्रग ओव्हरडोजही दिला. तसेच के के सिंह पुढे म्हणाले की, सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यात वर्ग करण्यात आले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्तीअंकिता लोखंडे