Join us  

नवऱ्यासोबत सवतीला पाहून संतापली होती अभिनेत्री; वाइनचा ग्लास मारला होता फेकून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:15 PM

Bollywood actor: सवतीसोबत भांडण करणारी ही अभिनेत्री कोण असेल तुम्ही ओळखलं का?

सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होते. मग ती लहान असो वा मोठी. यात खासकरुन बॉलिवूडसेलिब्रिटींविषयीच्या गोष्टी तर वाऱ्याच्या वेगाने पसरतात. सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन, कलाकारांचे अफेअर या चर्चा तर नेटकरी मोठ्या चवीने वाचतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्रीचं आणि तिच्या सवतीचं भांडण प्रचंड चर्चेत आलं होतं. या अभिनेत्रीने तर रागाच्या भराच चक्क वाईनचा ग्लास फेकून मारला होता.

मस्त-मस्त गर्ल या नावाने लोकप्रिय असलेली अभिनेत्री रविना टंडन हिची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. रविनाने २००४ मध्ये अनिल थडानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. रविनासोबत लग्न करणाऱ्या अनिल यांचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्यांनी नताशा सिप्पी सोबत पहिलं लग्न केलं होतं. विशेष म्हणजे एका पार्टीमध्ये रविनाने अनिल आणि नताशा यांना एकत्र पाहिलं आणि तिने वाईनचा ग्लास फेकून मारला. या पार्टीची त्यावेळी कलाविश्वात बरीच चर्चा झाली होती.

नेमकं काय घडलं होतं या पार्टीत?

२००६ मध्ये फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यात रविना, अनिल हे सुद्धा उपस्थित होते. मात्र, या पार्टीला नताशा सिप्पी सुद्धा आली होती. विशेष म्हणजे रविना अनिल यांच्यासाठी जेवणाचं ताट आणायला गेली असता नताशा, अनिल यांच्याशी गप्पा मारायला आली. इतकंच नाही तर ती सगळ्या पार्टीमध्ये अनिलचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे रविनाच्या रागाचा पारा चढला आणि तिने रागाच्या भराच वाईनचा ग्लास नताशाच्या अंगावर फेकला.

दरम्यान, या पार्टीमध्येच नताशा आणि रविना यांचं जोरदार भांडण झालं. त्यामुळे या पार्टीपेक्षा त्यांच्यातलं भांडण जास्त गाजलं. रविना आणि अनिल थडानी यांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर अनिल यांनी रविनाला लग्नाची मागणी घातली आणि त्यांनी २००४ मध्ये लग्न केलं. रविनासाठी अनिलने नताशाला घटस्फोट दिला.

टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडसेलिब्रिटीफरहान अख्तर