अभिनेत्री लिजा हेडन जुन्या जमान्यातील अभिनेत्री रती अग्निहोत्री यांची फॅन आहे. १९८२ मध्ये आलेल्या ‘शौकीन’ मध्ये रती यांनी केलेल्या अभिनयावर लिजा फिदा आहे. ती या चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘द शौकीन्स’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अशोक कुमार, उत्पल दत्त आणि ए. के. हंगल यांचा अभिनय असलेल्या ‘शौकीन’मध्ये रती मुख्य भूमिकेत होत्या. येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या ‘द शौकीन्स’मध्ये अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पीयूष मिश्रा मुख्य भूमिकेत आहेत. लिजा म्हणाली, ‘रती अग्निहोत्री त्या चित्रपटात उत्कृष्ट होत्या. मला त्यांचा अभिनय खूप आवडला.’ तिच्या मते रिमेकमधील तिने निभावलेले आहनाचे पात्र रतीच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. आयशा आणि क्वीनमध्ये लिजाच्या भूमिकांची लांबी जास्त नसली, तरी तिच्या अभिनयाची प्रशंसाच झाली आहे.
रती अग्निहोत्रीची फॅन आहे लिजा
By admin | Updated: November 5, 2014 00:37 IST