Join us

'या' लोकप्रिय अभिनेत्रीच्या टी-शर्टवरून ट्रोलर्सनी घेतली तिची शाळा, म्हणाले - दीदी पॅंट तर घालायची असतीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:17 IST

Rashmika Mandanna : साऊथ सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना लॉंग टी-शर्ट घालून एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)ला फॅन्सने नॅशनल क्रश ठरवलं आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती एक लॉंग टी-शर्ट घालून आहे. ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

साऊथ सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना लॉंग टी-शर्ट घालून एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी रश्मिका मंदाना एका बोल्ड लॉंग टी-शर्टमध्ये दिसली. ज्यामुळे फॅन्स तिला ट्रोल करत आहेत. फॅन्सने रश्मिका मंदानाच्या या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, 'ती पॅंट घालणं विसरली आहे का?'.

साऊथची क्वीन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सोशल मीडियावर बरीच मोठी फॅन्स फॉलोइंग आहे. ती आपल्या सुंदरतेसोबतच आपल्या कमाल अभिनयासाठीही ओळखली जाते. तिचे क्यूट एक्सप्रेशन फॅन्सना वेड लावतात. ती सध्या साऊथमधील टॉपची अभिनेत्री आहे.

ऱश्मिका मंदानाने २०१६ मध्ये कन्नड सिनेमा ‘kirik party’ मधून डेब्यू केलं होतं. आता ती लवकरच बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू सिनेमात दिसणार आहे. हा एक स्पाय थ्रीलर सिनेमा असणार आहे.  

टॅग्स :रश्मिका मंदानासेलिब्रिटी