Join us  

शूटिंगच्या वेळी यायच्या अलाउद्दीन खिल्जीसारख्या भावना- रणवीर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 10:27 AM

सिनेमात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगला व त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळते आहे.  

मुंबई- अनेक वादविवादानंतर अखेरीस दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमात अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगला व त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळते आहे.  सिनेमात नकारात्मक भूमिका साकारूनही रणवीरवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. तसंच त्याच्या भूमिकेची सगळीकडेच चर्चा सुरू आहे.  

अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारतानाचा आलेला अनुभव रणवीरने शेअर केला आहे. अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेसाठी मी खूप घाबरलो होतो. भूमिकेला न्याय देऊ शकेल का? याबद्दलची मनात भीती होती. ही भूमिका साकारताना मला काळ्या दलदलीच उतरावं लागणार याची पूर्ण कल्पना मला होती. पण मीच अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारावी असा संजय लीला भन्साळी यांचा अट्टहास होता. ते माझे गुरू असल्याने त्यांना नकार देणं मला शक्य नव्हतं, असं रणवीर सिंग म्हणाला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या विश्वासामुळे मी भूमिकेसाठी होकार कळविला. बाजीरावसोबतच या सिनेमाच शूटिंग सुरू झाल्याने दोन्ही भूमिकेत उतरण कठीण होतं. त्यातच माझ्या खांद्याला दुखापत झाल्याने माझं शूटिंग लांबणीवर गेलं. सिनेमातील इतर सगळ्या भूमिकांचं शूटिंग पूर्ण झालं होतं. फक्त माझ्याचं भूमिकेचं शूटिंग बाकी होतं. शेवटच्या 40 दिवसात मी सिनेमाचं शूट पूर्ण केलं. एकाच कॉस्ट्यूम ड्रामामध्ये तुम्हाला सतत 40 दिवस शूट करायला लागतं तेव्हा तुम्ही मनातून खचता. संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमात नेहमी कलाकारांना त्यांचं स्ट्रेस दूर करण्यासाठी ब्रेक मिळतो. पण मला ब्रेक मिळाला नव्हता. 

मी दररोज 12-14 तास शूटिंग करायचो. त्यावेळी अलाउद्दीन खिल्जीच्या झोनमध्ये गेलो होतो. त्यावेळी माझ्या अंगात फक्त वाईटप्रवृत्ती भरली होती. मी माझ्या कुटुंबीयांशी व मित्रांशी बोलणं बंद केलं होतं. सिनेमाच्या शूटिंगनंतर पुन्हा रणवीर व्हायला मी माझ्या आईशी बोलायला सुरूवात केली. मित्रांशी बोलायला सुरूवात केली. खिल्जीच्या भूमिकेत मी इतक्या खोलात उतरलो होतो की माझ्या मनात त्याच्यासारखेच विचार यायचे. कधीकधी शूटिंग करत नसताना माझ्या मनात खिल्जीसारख्या भावना यायचा. कुणी माझ्या समोर चूक केली की त्याचा गळा दाबायची इच्छा मला व्हायची, असंही रणवीर म्हणाला. माझ्या निगेटिव्ह भूमिकेलाही लोकांनी भरभरून प्रेम दिल्याचा आनंद आहे, अशी भावनाही त्याने व्यक्त केली. 

टॅग्स :रणवीर सिंगपद्मावतसंजय लीला भन्साळी