Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीरने लाइव्ह व्हिडीओमध्ये कापली दाढी!!

By admin | Updated: July 15, 2017 02:21 IST

सध्या रणवीर आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे

सध्या रणवीर आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात अल्लाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारत आहे. ज्याकरिता त्याने लांब केस, दाढी आणि पिळदार मिशा वाढविल्या आहेत. रणवीरचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. मात्र, आता रणवीर नवा अवतार धारण करणार असून, त्याचा हा लूक कसा असेल, याविषयी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. वास्तविक त्याने याबाबतची झलक लाइव्ह चॅटच्या माध्यमातून दाखवूनही दिली आहे. रणवीरने लाइव्ह व्हिडीओमध्ये दाढी कापली आहे. होय, ज्या लुकमध्ये रणवीर गेल्या कित्येक महिन्यांपासून बघावयास मिळत होता. आता तो त्या लुकमध्ये बघावयास मिळणार नाही.