ऑनलाइन लोकमत
मॅड्रिड, दि. २६ : स्पेनमधील माद्रिद येथे १७व्या IIFA २०१६च्या पुरस्कारांचे आनेवरण करण्यात आले यात रणवीरसिंग, दीपिका पादुकोण यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित करण्यात आले. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी‘ या चित्रपटाने पुरस्कारात बाजी मारली. यावेळी बॉलिवूडमधिल सर्वच दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली आहे. स्पेनमध्ये सगळे बॉलिवूड आवतले आहे.
आयफात दीपिकाने परिधान केलेल्या काळ्या ड्रेसमुळे ती आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली. यावेळी दीपिकाला पत्रकारांनी सर्वोत्तम अभिनेता कोण? विचारले असता ती रणवीरचे कौतुक करताना थकली नाही. बॉलिवूडचे लव बर्ड असलेल्या या देघांच्या प्रमप्रकरणास रामलीला या चित्रपटानंतर सुरवात झाली. अनेक पुरस्कार सोहळ्यात हे लव बर्ड एकत्र दिवसे. रणवीरने तर अनेकदा दिपिकाचे कौतुक केले आहे.
दीपिकाने रणवीरशिवाय कोणाचाच सर्वोत्तम अभिनेता म्हणून विचार करु शकत नाही असे म्हटले. रणवीरला चित्रपटसृष्टीतील केवळ ५ वर्ष झाले असताना त्याने दिलेला परफॉर्मन्स अप्रतिम आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्याला मिळायलाच हवा होता, असे दीपिकाने सांगितले.