Join us

रणबीरचे लग्न लांबणीवर

By admin | Updated: June 10, 2015 23:14 IST

बॉलीवूडचे बहुचर्चित लव्हबर्ड रणबीर कपूर आणि कटरिना कैफ सध्या हिरमुसले आहेत. याचे कारण म्हणजे दोघांचे लग्न लांबणीवर गेले आहे

बॉलीवूडचे बहुचर्चित लव्हबर्ड रणबीर कपूर आणि कटरिना कैफ सध्या हिरमुसले आहेत. याचे कारण म्हणजे दोघांचे लग्न लांबणीवर गेले आहे. त्याचे झाले असे, रणबीरचा ‘जग्गा जासूस’ पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपटाचे झालेले ५० टक्के चित्रीकरण पुन्हा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रणबीर-कॅटला अजून किती काळ वाट पाहावी लागणार काय माहीत.