Join us

कोण सजवतेय रणबीरचे घर?

By admin | Updated: June 20, 2016 01:34 IST

रणबीर कपूरने नवे घर घेऊन कित्येक दिवस झाले आहेत, पण घर घेऊन झाले असले, तरी या घराची सजावट अद्याप झालेली नाही. या घराची सजावट करण्याची सगळी जबाबदारी रणबीरने त्याची आई

रणबीर कपूरने नवे घर घेऊन कित्येक दिवस झाले आहेत, पण घर घेऊन झाले असले, तरी या घराची सजावट अद्याप झालेली नाही. या घराची सजावट करण्याची सगळी जबाबदारी रणबीरने त्याची आई नितू सिंगवर सोडलेली आहे. नितू आपल्या मुलाचे घर उत्कृष्ट पद्धतीने सजवले गेले पाहिजे, यासाठी चांगल्यातल्या चांगल्या इंटेरिअर डिझायनरची मदत घेत आहे. शाहरूखच्या ‘मन्नत’ बंगल्यातील इंटेरियर नितूला खूप आवडत असल्याने, इंटेरियरच्या बाबतीत ती शाहरूखची पत्नी गौरी खानकडूनही काही टीप्स घेत आहे. रणबीर चित्रीकरणात व्यस्त असला, तरी त्याची आई त्याच्या घराकडे संपूर्ण लक्ष देत आहे. रणबीरच्या आयुष्यात घर सजवणारी कोणी येत नाही, तोपर्यंत ही जबाबदारी त्याच्या आईनेच पार पाडायची ठरवली आहे, असेच यातून दिसून येत आहे.