Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीरच्या ‘बर्थडे’ला ‘फुटबॉल’चा केक

By admin | Updated: September 30, 2016 03:26 IST

ज से की आम्ही तुम्हाला सांगितले होते, रणबीर आपल्या नव्या घरी बर्थडे सेलिब्रेट करण्याचा प्लॅन करतोय. पण त्याआधीच त्याच्या 34 व्या वाढदिवशी ‘जग्गा जासूस’च्या

ज से की आम्ही तुम्हाला सांगितले होते, रणबीर आपल्या नव्या घरी बर्थडे सेलिब्रेट करण्याचा प्लॅन करतोय. पण त्याआधीच त्याच्या 34 व्या वाढदिवशी ‘जग्गा जासूस’च्या टीमने सरप्राईज दिले. ‘बर्थडे बॉय’साठी त्यांनी खास फुटबॉलच्या आकाराचा केक आणला होता. रणबीर फुटबॉलचा किती मोठा चाहता आहे हे वेगळे सांगायला नको. टीमच्या अशा सुखद सरप्राईजने तोदेखील भारावून गेला. सर्व क्रू मेंबर्सना त्याने केक भरवून त्यांचे आभार मानले. नंतर त्याने पाली हिल येथील नव्या घरी कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी ‘कपूर्स’ उपस्थित होते. लवकरात लवकर त्याने लग्न करावे अशी प्रार्थना ऋषी कपूर आणि नितू सिंग यांनी तर केली नसेल ना?