Join us  

Shamshera :  निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 4:51 PM

Ranbir Kapoor's Upcoming Movie Shamshera : रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटातील संजय दत्तचा लुक समोर आला आहे.

अभिनेता  रणबीर कपूर, अभिनेत्री वाणी कपूर आणि  संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. अंगावर शहारे आणणाऱ्या या टीझरने सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. आता या चित्रपटातील संजय दत्तचा लुक समोर आला आहे. वाणी कपूरचा लुकही रिव्हिल करण्यात आला आहे.

या चित्रपटात संजय दत्त शुद्ध सिंहची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात संजय दत्त एकदम हटके लुकमध्ये दिसतोय. हातात हंटर, कपाळावर टिळा असा  त्याचा लुक आहे. वाणी कपूरने संजयचा हा लूक शेअर केला आहे. ‘निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ पोलीस शुद्ध सिंह आहे, असं तिने संजयचा लुक शेअर करताना लिहिलं आहे.  शुद्ध सिंह या पोलीस अधिकारी आहे. 

वाणी बनली गोल्डन गर्लवाणी ही या चित्रपटात एका डान्सरची भूमिका या चित्रपटात साकारते आहे. ती जिद्दी आहे आणि तिचं मन सोन्यासारखं आहे. ती सोना आहे, असं स्वत:चा लुक शेअर करताना वाणीने लिहिलं आहे.

 ‘शमशेरा’मध्ये रणबीर डबल रोलमध्ये आहे.  हा चित्रपट हिंदी बरोबरच तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील रिलीज होणार आहे.   आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या 22 जुलै  रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना महामारीमुळे त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं.  

टॅग्स :शमशेरासंजय दत्तरणबीर कपूरवाणी कपूरबॉलिवूड