Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूर वादात! भाडेकरूने ठोकला ५० लाखांचा दावा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:07 IST

 रणबीर कपूर सध्या जोरात आहे. एकीकडे ‘संजू’तील भूमिकेसाठी होत असलेले कौतुक आणि दुसरीकडे आलिया भट्टच्या रूपात मिळालेले नवे प्रेम, यामुळे रणबीर सुखावला आहे. पण आता रणबीरबद्दल एक वेगळीच बातमी समोर आलीय.

 

 रणबीर कपूर सध्या जोरात आहे. एकीकडे ‘संजू’तील भूमिकेसाठी होत असलेले कौतुक आणि दुसरीकडे आलिया भट्टच्या रूपात मिळालेले नवे प्रेम, यामुळे रणबीर सुखावला आहे. पण आता रणबीरबद्दल एक वेगळीच बातमी समोर आलीय. होय, रणबीरवर ५० लाखांचा दिवाणी दावा ठोकला आहे. भाडे कराराचे पालन न केल्याबद्दल त्याच्या भाडेकरूंनी हा दावा दाखल केला आहे. पुण्याच्या कल्याणी नगरातील ट्रंप टॉवर्समध्ये रणबीर कपूरचा अलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट रणबीरने आत्तापर्यंत भाड्याने दिला होता. पण अचानक तो खाली करून घेतला गेला. शीतल सूर्यवंशी यांनी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. भाडेकरार संपायला आणखी काही अवधी शिल्लक होता. पण रणबीरने अचानक फ्लॅट खाली करण्याचे फर्मान सोडले. याविरोधात सूर्यवंशी यांनी रणबीरवर ५० लाखांचा दावा दाखल केला. भाडेकरारातील नियम न पाळल्याचा तसेच निश्चित काळापूर्वी फ्लॅट खाली करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अचानक फ्लॅट खाली करायण्यास सांगितले गेल्याने माझ्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला, असेही त्यांनी म्हटले आहे. मी या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊ इच्छितो, त्यामुळे घर खाली करावे, असा मेल रणबीरकडून सूर्यवंशी यांना मिळाला होता.

दरम्यान पुण्याच्या सिव्हील कोर्टात आपली बाजू मांडताना रणबीरने सगळे आरोप खोडून काढले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ आॅगस्टला होणार आहे.

टॅग्स :रणबीर कपूर