Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘जग्गा जासूस’मध्ये टीनेजर रणबीर

By admin | Updated: October 9, 2014 00:47 IST

आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात रणबीर कपूर एका १९ वर्षांच्या टीनेजरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे काही शूटिंग यापूर्वीच करण्यात आले आहे

आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात रणबीर कपूर एका १९ वर्षांच्या टीनेजरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे काही शूटिंग यापूर्वीच करण्यात आले आहे. सूत्रांनुसार रणबीर या चित्रपटात एका टीनेजरच्या भूमिकेत आहे, तर त्याची को स्टार कॅटरिना कैफ २२ वर्षांच्या एका तरुणीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटातील दोघांचा लूक भूमिकेप्रमाणे डिझाईन करण्यात आला आहे. आजवर सारख्याच वयाच्या भूमिका साकारणाऱ्या रणबीर आणि कॅटरिना या जोडप्याला अशा वेगळ्या भूमिकांत पाहण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.