Join us  

रणबीर कपूर-अरिजीत सिंहने जिंकली चाहत्यांची मनं, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये एकमेकांसमोर येताच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 2:32 PM

इतकंच नाही तर रणबीरने अरिजीतच्या 'चन्ना मेरेया' या गाण्यावर हुकस्टेपही केली.

बॉलिवूड मधील सर्वात टॅलेंटेड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय जादू होते याचा प्रत्यय नुकताच एका कॉन्सर्टमध्ये आलाय. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होतोय. यामध्ये दोघंही एकमेकांसमोर येताच गुडघे टेकून नमस्कार करताना दिसत आहेत.

चंदीगढमध्ये अरिजीत सिंहच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वत: रणबीर कपूरनेही या कॉन्सर्टला हजेरी लावली. एवढंच नाही तर स्टेजवर येत त्याने चाहत्यांना अभिवादनही केलं. यावेळी रणबीर आणि अरिजीतच्या एका कृतीने चाहत्यांचं मन जिंकलं. रणबीर जसा स्टेजवर आला काही अंतरावर समोरच अरिजीत सिंह गळ्यात गिटार घेऊन उभा होता. तेवढ्यात रणबीर खाली वाकला आणि गुडघे टेकून त्याने अरिजीतला नमस्कार केला. तेव्हा अरिजीतनेही तसंच करत सर्वांचं मन जिंकलं. आपापल्या क्षेत्रातील या दोन्ही दिग्गज सेलिब्रिटींच्या या कृत्याने कॉन्सर्टमध्ये एक वेगळाच माहोल तयार झालेला पाहायला मिळाला.  सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

इतकंच नाही तर रणबीरने अरिजीतच्या 'चन्ना मेरेया' या गाण्यावर हुकस्टेपही केली. 'ऐ दिल है मुश्कील' या रणबीरच्याच सिनेमातील अरिजीतने गायलेलं गाणं चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. अरिजीतचा आवाज आणि रणबीरचा भावूक अभिनय  आजही चाहत्यांच्या डोळ्यासमोर येतो. यानंतर अरिजीतने ब्रम्हास्त्र मधील केसरिया आणि रसिया ही गाणीही गायली. 

रणबीर कपूर आगामी 'अॅनिमल' सिनेमात दिसणार आहे. १ डिसेंबरला सिनेमा रिलीज होतोय. यातील रणबीरचा धाँसू लुक पाहून चाहते तर अक्षरश: वेडे झालेत. सिनेमात पहिल्यांदाच रणबीरसोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे. 

टॅग्स :रणबीर कपूरअरिजीत सिंहबॉलिवूड