Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणबीर कपूर-आलिया भट यांच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात, दोघांसाठी घर शोधतेय नीतू कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 13:47 IST

रणवीर सिंग व दीपिका पादुकोणनंतर आता आलिया भट व रणबीर कपूरच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरची आई नीतू कपूर त्या दोघांसाठी सध्या घर शोधते आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विवाह बंधनात अडकले. या दोघानंतर चाहत्यांचे अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट यांच्या लग्नाच्या वृत्ताची बातमी ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत. त्या दोघांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या घरातल्यांनी त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात केली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरची आई नीतू कपूर दोघांसाठी सध्या घर शोधते आहे. हे घर मुंबईत नाही तर न्यूयॉर्कमध्ये असणार आहे. नीतू कपूरला छानसे घर त्या दोघांसाठी पाहत आहे. म्हणजे तिचा मुलगा व सून अमेरिकेला गेल्यानंतर तिथे राहू शकतील. याचा अर्थ हा नाही की लग्नानंतर ते दोघे तिथे राहणार.

नीतू कपूरने बऱ्याच प्रॉपर्टी पाहिल्या असून अद्याप कोणतीही पसंतीस उतरली नाही. रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर बऱ्याच कालावधीपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यासोबत तिथे नीतू कपूरदेखील आहे. रणबीर तिथे त्यांना भेटायला जातो व आलियादेखील त्यांना बऱ्याचदा भेटायला गेली आहे.

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, भट व कपूर कुटुंबिय ऋषी कपूर भारतात आल्यानंतर सर्वात आधी ब्राह्मणाला भेटणार. एप्रिलपर्यंत त्या दोघांच्या लग्नाची तारीख ठरू शकते. ऋषी कपूर या महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात परतणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटनितू सिंग