आ गामी संजय दत्त बायोपिकमध्ये रणबीर कपूर ‘खलनायक’ स्टार संजूबाबाची भूमिका करणार आहे ‘मुन्नाभाई सिरीज’, ‘३ इडियटस्’, ‘पीके’ फेम दिग्दर्शक राजकुमार हिराणी तो दिग्दर्शित करीत आहेत. मध्यंतरी संजय रणबीरला टाळत होता. एका पार्टीत दोघांचे भांडण झाल्याचेही वृत्त होते. रणबीरच्या निवडीमुळे संजय दत्त खुश नाही. रणबीरचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व त्याच्यासारखे नसल्यामुळे तो थोडासा चिंतीत आहे, अशी अफवा पसरली होती. या सगळ्या प्रकराणाला फुल स्टॉप लावण्यासाठी अखेर हिराणींना पुढे यावे लागेल. ‘दंगल’च्या प्रीमियरला आलेल्या हिराणींनी पत्रकारांना उत्तर देताना म्हटले की, ‘रणबीर-संजयमध्ये वाद असल्याच्या बातम्या पूर्ण असत्य आहे. दोघांची खूप चांगली मैत्री असून संजय त्याला मदत करण्यासाठी खूप मदत करीत आहे. संजयचा स्वभावच मुळात मिश्किल आणि विनोदी आहे. रणबीरला टाळत असल्याची गोष्ट त्याच्या विनोदाचा एक भाग आहे. त्यामुळे या चर्चा थांबवा.’
रणबीर आणि संजयमध्ये सगळे अलबेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 04:07 IST