Join us

राम कपूर आणि गुरदीप कोहली पुन्हा एकत्र

By admin | Updated: February 13, 2015 23:36 IST

प्रेक्षकांना भुरळ पाडणारी ‘कसम से’ या मालिकेतील प्रसिद्ध जोडी अर्थात राम कपूर आणि गुरदीप कोहली आपल्या आगामी मालिकेसाठी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत

प्रेक्षकांना भुरळ पाडणारी ‘कसम से’ या मालिकेतील प्रसिद्ध जोडी अर्थात राम कपूर आणि गुरदीप कोहली आपल्या आगामी मालिकेसाठी पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अनुपम खेर व पूजा भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘डॅडी’ चित्रपटावर आधारित या मालिकेतून ही जोडी लवकरच पे्रक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे एक असाधारण ‘थीम’ असणाऱ्या या मालिकेत राम आणि गुरदीपची वेगळीच केमिस्ट्री पे्रक्षकांना अनुभवायला मिळणार यात शंकाच नाही. या आगळ््यावेगळ््या केमिस्ट्रीसाठी राम आणि गुरदीप, आॅल दी बेस्ट... !