Join us
Daily Top 2Weekly Top 5

रकुल प्रीत सिंगनं धिरज देशमुख यांच्यासोबतचा फोटो केला पोस्ट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:22 IST

रकुलनं काँग्रेस नेते धिरज देशमुख यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. 

रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh)ला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सध्या रकुल हिंदी आणि तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची नायिका आहे. 'यारियॉं' या पहिल्याच हिंदी चित्रपटातून प्रचंड स्टारडम मिळवणारी रकुल ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. सोशल मीडियावर विविध पोस्ट करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आताही ती प्रसिद्धीझोतात आली आहे. रकुलनं काँग्रेस नेते धिरज देशमुख यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. 

धिरज देशमुख यांचा काल वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. रकुल प्रित सिंगनेही खास पोस्ट करत धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने तिच्या व जॅकीच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले. फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा धिरज भैय्या, तुमची माया, दयाळूपणा आणि सकारात्मकता प्रत्येकाचे जीवन उजळवते. तुम्ही फक्त कुटुंबातील एक व्यक्ती नाही आहात तर  तुम्ही एक खरे आदर्श आहात. तुमचा दिवस प्रेम, हास्य आणि तुम्ही पात्र असलेल्या सर्व आनंदाने भरलेला जावो अशी शुभेच्छा".  रकुलच्या पोस्टवर धिरज यांच्या पत्नी दिपशिखा यांनी हार्ट एमोजी पोस्ट केले.

 

रितेश देशमुखचे भाऊ धिरज यांची पत्नी दिपशिखा या रकुलच्या सख्ख्या नणंदबाई आहेत. दीपशिखा आणि जॅकी हे सख्खे भाऊ-बहिण आहेत. दीपशिखा भगनानी आणि धीरज देशमुख हे २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांना वंश आणि दिवियाना अशी दोन मुलं आहेत. रकुलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच  'मेरे हसबंड की बिवी' या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात रकुलसह अभिनेता अर्जुन कपूर आणि  भूमी पेडणेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाले होते.  

टॅग्स :रकुल प्रीत सिंगधीरज देशमुखजॅकी भगनानीरितेश देशमुख