Join us
Daily Top 2Weekly Top 5

राखी सावंतच्या एक्स पतीनं पुन्हा थाटला संसार, अभिनेत्रीसोबत गुपचूप केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 17:28 IST

Rakhi Sawant : राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी याने पुन्हा लग्न केल्याचे वृत्त आहे. त्याने जयपूरमध्ये एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखी अलीकडे तिचा दुसरा पती आदिल खान दुर्रानी(Aadil Khan Durrani)सोबत सुरू असलेल्या कोर्ट केसमुळे चर्चेत आली होती. राखी सावंतनेही आदिलवर अनेक गंभीर आरोप केले, त्यानंतर आदिलने ५ महिने तुरुंगात काढले. आता बातमी अशी आहे की तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्याने दुसरे लग्न केले आहे.

राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानी याने पुन्हा लग्न केल्याचे वृत्त आहे. त्याने जयपूरमध्ये एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचे वृत्त आहे. वधूचे बॉलिवूडमधील 'भाईजान' म्हणजेच सलमान खानशी नाते आहे. कोण आहे ती अभिनेत्री जिच्यासोबत आदिलने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली. 

जयपूरमध्ये दुसरे लग्नईटाइम्सने एका सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात असे लिहिले आहे की राखी सावंतचा एक्स पती आदिल खान दुर्रानीने पुन्हा एकदा संसार थाटला आहे. नुकतेच त्याने जयपूरमध्ये बिग बॉस १२ फेम सोमी खानशी लग्न केले. दोघांचा हा विवाहसोहळा खासगी होता, कारण दोघांची तशी इच्छा होती. आदिलने सबा खानची बहिण सोमी खानशी लग्न केले. याचे कारण म्हणजे आदिल आधीच अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. मात्र आदिल किंवा सोमी खान यांनी अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

कोण आहे सोमी खानसोमी खान आणि सबा खान 'बिग बॉस १२' मध्ये स्पर्धक म्हणून दिसले होते. दोघी बहिणी आहेत आणि जयपूर येथील रहिवासी आहेत. सध्या ती तिच्या करिअरच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक आहे. सोमी खान ही टीव्ही अभिनेत्री आहे. तिने 'न्याय: द जस्टिस', 'केसरिया बालम' आणि 'हमारा हिंदुस्तान' सारखे शो केले आहेत.

२०२३ मध्ये आदिल आणि राखी झाले वेगळे आदिल खान दुर्रानीचे पहिले लग्न राखी सावंतसोबत झाले होते. मात्र, गेल्या वर्षी बिग बॉस फेम आदिलवर अनेक आरोप आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर दोघे वेगळे झाले. 

टॅग्स :राखी सावंत