Join us

राखी सावंतने रानू मंडलला दिली स्पेशल ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 11:12 IST

पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आता बॉलिवूड स्टार झालीय. नुकतेच रानूने हिमेश रेशमियासाठी तीन गाणी गायलीत. आता ड्रामा क्वीन राखी सावंत हिनेही रानूला एक स्पेशल ऑफर दिली आहे.

ठळक मुद्देलवकरच ‘बिग बॉस’चा 13  वा सिझन सुरू होणार आहे. यावेळी ओपनिंग शोलाच राखी या शोमध्ये सहभागी होणार आहे.

पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आता बॉलिवूड स्टार झालीय. नुकतेच रानूने हिमेश रेशमियासाठी तीन गाणी गायलीत. आता ड्रामा क्वीन राखी सावंत हिनेही रानूला एक स्पेशल ऑफर दिली आहे. होय, राखीच्या ‘छप्पन छुरी’ या गाण्याच्या रिमिक्स व्हर्जनला राणूने आपला आवाज द्यावा, अशी राखीची इच्छा आहे. हे ओरिजनल गाणे मंदाकिनी बोरा हिने गायले आहे.

लवकरच ‘बिग बॉस’चा 13  वा सिझन सुरू होणार आहे. यावेळी ओपनिंग शोलाच राखी या शोमध्ये सहभागी होणार आहे. यावेळी ती  ‘छप्पन छुरी’ या तिच्या आयटम साँगचे प्रमोशन करण्यासाठी या मंचावर हजेरी लावणार आहे. सलमान समोर  आयटम साँग्स करणार या गोष्टीमुळे ती ‘आज मै उपर आसमाँ निचे’ अशीच तिचा अवस्था झाली आहे. बिग बॉसच्या मंचावर राखी पुन्हा एकदा आग लावणार म्हटल्यावर तिच्या या गाण्यालाही जोरदार पल्बिसिटी मिळणार हे नक्की आहे. अशात या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन रानूने गावे, अशी इच्छा राखीने व्यक्त केली आहे.

या आयटम साँगच्या लॉन्चवेळी राखी रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली होती. यावरून ती प्रचंड ट्रोल झाली होती. या ड्रेसमधील सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून युजर्सने संतप्त प्रतिक्रीया दिल्या होत्या. या प्रतिक्रिया पाहून राखी ढसाढसा रडली होती. ‘ त्या ड्रेसवर सगळ्यांच्या नजरा असतील, हे मला ठाऊक नव्हते. माझे शरीर यातून दिसेल, याचाही मला अंदाज नव्हता. मला असे काहीही करायचे नव्हते. आता लोक मला दोष देत आहेत. मला वाईट बोलत आहेत. मी खूप स्ट्राँग आहे.  या गोष्टींचा मला अजीबातच फरक पडत नाही. मला माझी बॉडी दाखवण्यात काहीही इंटरेस्ट नाही. लोक मला समजून घेत नाहीत. आज मी खूप दु:खी आहे,’ असे तिने म्हटले होते. 

टॅग्स :राखी सावंतराणू मंडल