Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच समोर आला राखीच्या सासरच्या घराचा व्हिडीओ, आलिशान हॉटेलपेक्षा ही आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 15:19 IST

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही सुद्धा या घराच्या प्रेमात पडाल.

गेल्या काही महिन्यांपासून राखी सावंत तिच्या सीक्रेट मॅरेजला घेऊन चर्चेत आहे. करवा चौथ’च्या दिवशी राखीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत ती गाजराचा हलवा बनवताना दिसली होती. मी युकेत आहे आणि घरी गाजराचा हलवा बनवतेय, असा दावा राखीने या व्हिडीओत केला होता. यावरुन राखीला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले होता. त्यानंतर पुन्हा एकदा राखाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओतले घर तिचे सासर असल्याचा दावा राखीने केला आहे. राखीने व्हिडीओत शेअर केलेले घरं कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा कमी नाहीय.  या व्हिडीओला राखीने कॅप्शन दिले आहे की, मी माझ्या पतीची राजकुमारी आहे आणि हे माझं घरं.  राखीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे. राखी खोटं बोलत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

राखी सांगते तिचा पती एनआरआय असून तो खूप स्मार्ट आणि हँडसम आहे.आम्ही लंडनमध्ये नवे घर खरेदी केले आहे. मी स्वयंपाकही शिकले आहे. चपाती आणि भाजीपासून सुरुवात केली,’ असे राखीने सांगितले होते.

राखीने 28 जुलैला एका पंचताराकित हॉटेलमध्ये मुंबईत गुपचुप लग्न केले. या सोहळ्याला केवळ 4-5 लोक हजर होते. लग्नाचा बोभाटा होऊ नये म्हणून, हॉटेलचा संपूर्ण हॉल बुक न करता हॉटेलच्या खोलीतच लग्नविधी पार पडला, असे राखीने सांगितले होते. त्यादिवसापासून राखीचं लग्न मिस्ट्री बनून राहिलं आहे.  

टॅग्स :राखी सावंत