Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राखी सावंतने घेतला निर्णय; फॅन्सला म्हणाली, तुम्ही आशीर्वाद देणार नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 13:22 IST

बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करून चर्चेत राहण्याची कला तिने चांगलीच अवगत केलीय. सध्या तिचा एक नवा व्हिडीओ असाच चर्चेत आहे.

ठळक मुद्देराखीने एनआरआय व्यक्तिशी लग्न केले खरे. पण अद्याप राखीचा हा पती कोण, तो दिसतो कसा, हे ठाऊक नाही.

बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत कायम आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट करून चर्चेत राहण्याची कला तिने चांगलीच अवगत केलीय. सध्या तिचा एक नवा व्हिडीओ असाच चर्चेत आहे. होय,  ‘छप्पन छुरी’ हे गाणे हिट व्हावे यासाठी राखीने एक अनोखी रिक्वेस्ट केली आहे.युकेमध्ये राहणा-या एनआरआयशी सीक्रेट वेडिंग केल्यानंतर अलीकडे राखीचे ‘छप्पन छुरी’ हे गाणे रिलीज झाले. सध्या राखीचे हे गाणे नंबर 6 वर ट्रेंड करतेय. पण राखीला हे गाणे नंबर 1 वर हवे आहे. राखीने हे गाणे नंबर 1 बनवण्यासाठी एक नवा फंडा आजमावला आहे.

‘अरे, माझ्या चाहत्यांनो. कसे चाहते आहात तुम्ही? इतक्या वर्षांत मी तुमचे अपार मनोरंजन केले. आता मी माझ्या पतीजवळ युकेला जाणार आहे. अगदी कायमची. आता जाता जाता इंडस्ट्रीत एक हिट तर बनतेच. 12-15 वर्षे मी इंडस्ट्रीत काढली. भुकेल्या पोटी सलाद खाऊन, सुंदर बनून तुम्हाला एंटरटेन केले. इतका डान्स केला, इतकी कॉमेडी केली. आता मी पतीकडे जातेय. जाता जाता तुम्ही आशीर्वाद देणार नाहीत का? माझे गाणे शेअर करा, त्याला नंबर 1 बनवा. लवकर शेअर करा,’ असे राखी व्हिडीओत म्हणतेय.

राखीने एनआरआय व्यक्तिशी लग्न केले खरे. पण अद्याप राखीचा हा पती कोण, तो दिसतो कसा, हे ठाऊक नाही. राखीच्या पतीचे नाव राकेश आहे.

टॅग्स :राखी सावंत