Join us

राखी सावंतने रचले लग्नाचे ढोंग? बातमी वाचून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 17:53 IST

अशी झाली पोलखोल

ठळक मुद्दे28 जुलै 2019 ला मॅरिएट हॉटेलमध्ये लग्न झाल्याचा दावा राखीने केला होता.

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हणतात ते उगाच नाही. वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत कसे राहायचे हे राखी सावंतकडून शिकायला हवे. तूर्तास राखी बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये अशाच एक ना अनेक ड्रामे करताना दिसतेय. कधी तिच्या अंगात ज्युलीचे भूत येते, कधी ती नव-याच्या आठवणीत रडते. होय, रितेश नावाच्या एनआरआयसोबत लग्न झाल्याचा दावा राखी करते. पण अद्याप हा रितेश कोण, कुठला, हे कोणालाही ठाऊक नाही. मध्यंतरी तिचा हा रितेश नावाचा नवरा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येणार, अशीही बातमी होती. पण तो काही आला नाही आणि आता राखीचे लग्नच झालेले नाही, असे तुम्हाला कोणी सांगितले तर? धक्का बसेल ना, पण हे खरे आहे. राखीने पुन्हा एकदा लग्न झाल्याचा खोटा दावा केला आहे.

स्पॉटबॉयने एका एक्सक्लुसिव्ह वृत्ताच्या माध्यमातून राखीचे लग्न झालेच नसल्याचे म्हटले आहे. राखी सावंत याआधीही असेच खोटे दावे करत आली आहे आणि रितेश नावाच्या एनआरआयसोबत लग्न झाल्याचा तिचा दावाही खोटा आहे. तिचे लग्न झालेलेच नाही, असे या वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2018 मध्ये राखीने ती दिपक कलालशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण नंतर हा सगळा ड्रामा असल्याचे सिद्ध झाले होते.

28 जुलै 2019 ला मॅरिएट हॉटेलमध्ये लग्न झाल्याचा दावा राखीने केला होता. मात्र या हॉटेलच्या रेकॉर्डवरून या तारखेला रितेश व राखीचे कोणतेच लग्न झाले नसल्याचे स्पष्ट झाले. तूर्तास राखी लग्नाबद्दल पुन्हा एकदा खोट बोलल्याचे ऐकून चाहतेही हैराण आहेत. कारण राखीच्या या ड्राम्यात तिचे कुटुंबही सहभागी झाले आहे. राखीच्या आईने अलीकडेच रितेश माझ्या उपचाराचा संपूर्ण खर्च करत असल्याचा दावा केला होता. राखीच्या भावानेही तो राखीच्या लग्नात हजर होता असा दावा केला होता. आता राखी यावर काय स्पष्टीकरण देते, ते बघूच.

टॅग्स :राखी सावंत