Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच रडली राखी सावंत, पती रितेशचे पत्र वाचून झाली भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 18:31 IST

राखी सावंतचा पती रितेश युकेमध्ये वास्तव्यास असून एक बिझनेसमन आहे. राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सशी बातचीत केली. त्याने सांगितले की, 'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी अद्याप सर्वांसमोर आलो नाही. माझे लग्न आतापर्यंत लपवून ठेवले होते, ही माझी चूक होती.

आयटम गर्ल राखी सावंत सध्या ख्रिसमध्येच्या मुडमध्ये दिसत आहे. बिग बॉस १४ मध्ये स्पर्धक राखी सावंत पुढे फिके पडत आहेत. राखी फुल ऑन मनोरंजन करत रसिकांचीही पसंती मिळवत आहे. गेल्या काही दिवसांपासून राखी तिच्या पतीला सा-यांसमोर आणणार असल्याचे सांगत आहे. दरवेळी स्पर्धकांसह ती विवाहीत असल्याचे सांगते. स्पर्धकही मजा घेत तिची फिरकी घेत असतात. सध्या सर्वत्रच ख्रिसमसचे सेलिब्रेशन होत असताना राखी मात्र भावूक झाली. राखीच्या पतीने तिच्यासाठी खास एक पत्र पाठवले आहे. हे पत्र वाचून राखी भावूक होते.

 

पत्रात पतीने लिहीले होते की, माझी प्रिय पत्नी राखी, यंदाचे सेलिब्रेशन तुझ्यामुळे खूप खास बनले आहे. तुच माझे आयुष्य आहे. बिग बॉसच्या घरात तु खूप चांगले काम करत आहेस.कृपया इतरांचे मनोरंजन करता येईल यावर अधिक भर दे. जसे यापूर्वी तू खेळली आहेस तशी खेळी या सिझनमध्ये दाखव.गेम वर जास्त फोकस कर. यावेळी तुला बिग बॉसचे विजेती बनताना पाहायचे आहे. तुझ्यावर मला गर्व आहे. जिंकुन येशील याची मला खात्री आहे. 

पत्र वाचून झाल्यावर राखी बोलते, मला गेम खेळता येत नाही रितेश, मी फक्त मनोरंजन करु शकते. प्रत्येक गोष्टीत मी कुरघोड्या करत बसत नाही. जर कोणी मला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल त्यावरच मी स्वतःची बाजु मांडते.कॅम-याला लूक देत थैंक्यू रितेश...लव यू...गॉड ब्लेस यू..माझ्यासाठी तुझ्या बिझी शेड्युअरमधून वेळ काढलास यापुढे माझ्यासाठी असाच वेळ काढत राहा कारण माझ्या आयुष्यात मला कधीच खरे प्रेम मिळाले नाही. मात्र माहिती आहे तुझे माझ्यावर खरे प्रेम आहे. 

राखी सावंतचा पती रितेश युकेमध्ये वास्तव्यास असून एक बिझनेसमन आहे. राखी सावंतचा पती रितेशने बॉम्बे टाइम्सशी बातचीत केली. त्याने सांगितले की, 'माझ्या स्वार्थी हेतूमुळे मी अद्याप सर्वांसमोर आलो नाही. माझे लग्न आतापर्यंत लपवून ठेवले होते, ही माझी चूक होती. मला असे वाटायचे की मी राखीशी माझी ओळख असणे आणि मी राखीशी लग्न करणे हे जर जगाला समजले तर माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील.

टॅग्स :राखी सावंत