Join us
Daily Top 2Weekly Top 5

होय, मी लग्न केले! अखेर ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने दिली कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 10:13 IST

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखीने मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले, अशी बातमी कालपरवा आली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण या बातमीनंतर काही तासांतच माझ्या लग्नाची बातमी खोटी आहे, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला.

ठळक मुद्देगत 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते.

ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखीने मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलात एका एनआरआयशी गुपचूप लग्न केले, अशी बातमी कालपरवा आली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण या बातमीनंतर काही तासांतच माझ्या लग्नाची बातमी खोटी आहे. मी त्या हॉटेलात ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते, असे सांगून राखीने नेहमीप्रमाणे ‘ड्रामा’ केला. पण लपवून लपवून किती लपवणार? शेवटी राखीने स्वत:च लग्न केल्याची कबुली दिली. मी लग्न केले, अशी कबुली तिने दिली.

‘होय, मी लग्न केले आहे. पण आधी मी हे मान्य केले नाही. कारण मी घाबरले होते. मात्र आता मी लग्न केल्याची बातमी स्वत: तुमच्याशी शेअर करतेय. माझा पती एनआरआय आहे. त्याचे नाव रितेश आहे आणि तो युकेचा आहे. लग्नानंतर तो लगेच परत गेला. माझ्या व्हिसाची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाली की, मी त्याच्याजवळ जाईल,’ असे राखीने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. इतका चांगला नवरा मिळाल्याबदद्ल तिने परमेश्वराचे आभारही मानलेत.

सुरुवातीला राखीने लग्नाच्या बातम्या नाकारल्या. पण आपल्या सोशल मीडियावर नववधूच्या लूकमधील अनेक फोटो तिने पोस्ट केले. या प्रत्येक फोटोत राखीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, भांगेत कुंकू आहे आणि हातात चुडा आहे.  तिच्या हातातील चुड्यावर तिच्या पतीचे नावही लिहिलेले दिसतेय.

गत 29 जुलैला मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलात राखीचे सीक्रेट मॅरेज झाले. हे लग्न इतके गुपचूप झाले की, लग्नाला केवळ 4-5 लोक तेवढे हजर होते. लग्नाची बातमी लपवून ठेवण्यासाठी हॉटेलच्या रूममध्ये लग्न केले गेले होते.

टॅग्स :राखी सावंत