Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला कारपर्यंत..."; अभिनेत्याने केला कास्टिंग काउचचा सामना, निर्मात्याची होती 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:42 IST

अभिनेत्याने एका मुलाखतीत तो कास्टिंग काउचचा बळी ठरला असल्याचा मोठा खुलासा केला आहे. तसेच अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. 

टीव्ही इंडस्ट्री, चित्रपट आणि ओटीटीमध्ये अभिनेता राजीव खंडेलवालने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे असंख्य चाहते आहेत. आपल्या अभिनयाने त्याने सर्वांत लक्ष वेधून घेतलं आहे. अशातच राजीव खंडेलवालने एका मुलाखतीत तो कास्टिंग काउचचा बळी ठरला असल्याचा मोठा खुलासा केला आहे. तसेच अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. 

सिद्धार्थ कन्ननसोबत एका मुलाखतीत बोलत असताना राजीव खंडेलवालने सांगितलं की, निर्मात्याने त्याला चित्रपटासाठी बोलावलं आणि विचित्रपणे त्याच्याशी वर्तन केलं होतं. त्यावेळी तो याबाबत काहीच बोललो नाही. हा मोठा माणूस होता का? असं विचारल्यावर राजीवने, निर्मात्याने अलीकडेच १०० कोटी रुपयांचा चित्रपट केल्याचं सांगितलं. तसेच त्याने मी आताच १०० कोटींचा हिट चित्रपट दिला आणि तू मला नकार देत आहेस? असंही म्हटल्याचं सांगितलं. 

खुलासा करताना राजीव म्हणाला की, "तो मला म्हणाला की, मला असं सांगण्यात आलं की तू खूप चांगला माणूस आहेस, पण मलाच असं वाटत नाही. तुझ्याबद्दल मी खूप काही ऐकून आहे. हे ऐकल्यावरच मला निर्माता नेमकं काय म्हणायचा प्रयत्न करतोय आहे याची हिंट मिळाली होती. त्याने विचारलं की, मला त्याचा चित्रपट करायचा आहे का?, पण मी त्याला यावर मला आधी स्क्रिप्ट पाहायची आहे असं सांगितलं. तर तो म्हणाला, मी माझ्या स्क्रिप्ट्स कुणाला देत नाही, पण मला तू आवडतोस, म्हणून तुझ्यासाठी एक गाणं म्हणेन."

अभिनेता म्हणाला की, निर्मात्याने त्याला सांगितलं की मी जेव्हा गाणं म्हणेन तेव्हा तू माझ्या डोळ्यात बघ. यानंतर त्याच्याकडे मी पुन्हा स्क्रिप्ट मागितली, पण नंतर त्याने मला बाहेरचा रस्ता दाखवला आणि मला माझ्या कारपर्यंत सोडायला आला. मी तुला दोन चित्रपटांसाठी साईन करणार होतो, पण आता तू आयुष्यात कसा आणि किती पुढे जातो ते बघतोच असंही म्हटलं. राजीव खंडेलवाल शेवटचा इमरान हाश्मीच्या 'शोटाइम'मध्ये दिसला होता. 

टॅग्स :राजीव खंडेलवालकास्टिंग काऊच