'रेड २' सिनेमाची (raid 2 movie) सध्या चर्चा आहे. आज १ मे रोजी हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होत आहे. २०१८ साली आलेल्या 'रेड' सिनेमाचा हा पुढचा भाग आहे. रेडचा पहिला भाग चांगलाच गाजला होता. सौरभ शुक्ला यांनी साकारलेला खलनायक आणि अजय देवगणने साकारलेली प्रमुख भूमिका याचं खूप कौतुक झालं. अशातच 'रेड २'मध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीने रितेश देशमुख - अजय देवगणसोबत काम करुन लाइमलाइट लुटली आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
या मराठी अभिनेत्रीची 'रेड २'मध्ये महत्वपूर्ण भूमिका
'रेड २'मध्ये मराठमोळी अभिनेत्री रितीका श्रोत्रीची महत्वपूर्ण भूमिका आहे. ही भूमिका अत्यंत संवेदनशील आहे. रितीकाने अत्यंत उत्तमरित्या ही भूमिका साकारली आहे. इतकंच नव्हे 'रेड २'मध्ये रितीकाला अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर, सुप्रिया पाठक यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे. रितीकाच्या चाहत्यांना 'रेड २'मध्ये तिला वेगळ्या भूमिकेत बघून नक्कीच आनंद होईल यात शंका नाही.
'रेड २' विषयी
'रेड २' सिनेमाविषयी सांगायचं तर या अजय देवगण- रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमात वाणी कपूर अजयच्या बायकोच्या भूमिकेत आहे. दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तसंच सौरभ शुक्लाही सिनेमात दिसणार आहे जे पहिल्या भागात मुख्य खलनायक होते. याशिवाय सुप्रिया पाठक, अमित सियाल हे कलाकारही भूमिका साकारताना दिसणार आहेत. आज १ मे रोजी सिनेमा रिलीज झाला आहे.