Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल देव माझ्यासाठी स्पेशल - मुग्धा गोडसे

By admin | Updated: October 7, 2015 18:47 IST

राहुल देव आणि माझी ओळख मैत्रीपुरतीच मर्यादित नसून आमच्यात मैत्रीपेक्षाही जास्त काही आहे असे सांगत मुग्धाने प्रेमाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - मराठमोळी अभिनेत्री मुग्धा गोडसेने राहुल देवसोबतच्या प्रेमसंबंधांची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे. राहुल देव आणि माझी ओळख मैत्रीपुरतीच मर्यादित नसून आमच्यात मैत्रीपेक्षाही जास्त काही आहे असे सांगत मुग्धाने प्रेमाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. 
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मुग्धा गोडसे आणि राहुल देव यांच्यात प्रेमसंबंधी असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मध्यंतरी दोघेही समुद्र किनारी सुट्टींचा आनंद लुटताना दिसले होते. तसेच दोघेही एकत्र चित्रपटही करत आहे. या पार्श्वभूमीवर मुग्धाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल देवसोबतच्या संबंधावर भाष्य केले. मुग्धा म्हणते, जेव्हा तुम्ही मैत्रीच्या नात्यापेक्षा आणखी पुढे जाता तेव्हा एकत्र काम करणे आणखी सोपे होते. लग्नाचा काय विचार आहे या प्रश्नावर मुग्धा म्हणते, लग्न हे स्वर्गात ठरतात, ते जेव्हा व्हायचं तेव्हा होईलच. सध्या माझ्या आईवडिलांनी लग्नासाठी माझ्यावर कोणताही दबाव टाकलेला नाही.