Join us

राधिकापाठोपाठ किशोरी शहाणेदेखील हॉलीवूडपटात

By admin | Updated: January 28, 2016 02:54 IST

सध्या मराठी कलाकारांच्या स्वप्नांना चार चाँद लागलेले दिसतात. कारण मराठी चित्रपटसृष्टी आज उंचावर पोहोचत आहे, याची ती यशस्वी पावती म्हणता येईल. कारण बॉलीवूड दिग्दर्शक

सध्या मराठी कलाकारांच्या स्वप्नांना चार चाँद लागलेले दिसतात. कारण मराठी चित्रपटसृष्टी आज उंचावर पोहोचत आहे, याची ती यशस्वी पावती म्हणता येईल. कारण बॉलीवूड दिग्दर्शक नाहीच तर थेट हॉलीवूड दिग्दर्शकदेखील मराठी अभिनेत्रींना हॉलीवूडच्या चित्रपटात घेण्याचा विचार करीत आहेत. विश्वास बसत नाही ना? तर ऐका, राधिका आपटेपाठोपाठ किशोरी शहाणे या सुंदर अभिनेत्रीचीदेखील हॉलीवूडपटात काम करण्यासाठी निवड झाली आहे. प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक ड्युएन अ‍ॅडलेर यांच्या हार्टबिट्स या आगामी चित्रपटासाठी त्यांची निवड करण्यात आली. हा चित्रपट नृत्यावर आधारित असून, इंडो-अमेरिकन स्वरूपाचा आहे. यामध्ये त्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीय स्त्रीची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २०१७मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचे ५० टक्के चित्रीकरण पवई व अंबरनाथ येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.