Join us  

कंगना रणौतच्या 'तेजस' चित्रपटाचा टीझर रिलीज; डॅशिंग अवतारात बॉलिवूडची क्वीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 11:43 AM

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतच्या 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'तेजस'चा दमदार टीझर रिलीज झाला आहे. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या टीझरला चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.  या टीझरमधील  'भारत को छेडोगे, तो छोडेंगे नहीं' हा डायलॉग सोशल मीडियावर चर्चेत आलाय. तर एअरफोर्स पायलटच्या ड्रेसमध्ये कंगनाच्या डॅशिंग लूकने सर्वांचं लक्ष वेधलयं. 

 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर भारतीय वायुसेना दिनाला अर्थात 8 ऑक्टोबरला रिलीज होईल. RSVP निर्मित 'तेजस'मध्ये देशाचे रक्षण करण्यासाठी कसे हवाई दलाचे वैमानिक आपल्या जीवाची बाजी लावतात, हे या दाखवले आहे.  हा टीझर पाहून कंगनाच्या चाहत्यांना आता चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाल्यास, नुकताच तिचा 'चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शिवाय ती  'इमरजेंसी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात तिच्यासोबत श्रेयस तळपदे, अनुपम खेर, सतीश कौशिक, महिमा चौधरी असे अनेक कलाकार असतील. 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडसेलिब्रिटीहवाईदल