चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर पडत अनिकेत विश्वासरावने ‘पोश्टर बॉईज’मध्ये वेगळा पण रांगडा अभिनय करत छाप पाडली. या दरम्यान अनिकेत आणि पल्लवी सुभाषही वेगळे झाले. त्यामुळे अनिकेतची राणी आता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र ‘रीअल’ लाइफमध्ये राणी कधी येईल तेव्हा येईल. पण सध्या अनिकेत 'रील’ लाइफमध्ये राणीच्या पाठी लागलाय. त्याचा 'एक होती राणी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्याचे पोस्टर नुकतेच रिव्हील झालेय. या चित्रपटात त्याची राणी कोण आहे हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.
अनिकेतची राणी
By admin | Updated: March 28, 2015 23:10 IST