Join us

पूजावर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव

By admin | Updated: March 10, 2016 01:28 IST

‘पोश्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री पूजा सावंत हिने अगदी कमी कालावधीत इन्स्टाग्रामवर एक लाख चाहत्यांचा टप्पा पार केला

‘पोश्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री पूजा सावंत हिने अगदी कमी कालावधीत इन्स्टाग्रामवर एक लाख चाहत्यांचा टप्पा पार केला. प्रेक्षकांच्या या प्रेमाचा पाऊस पाहून पूजाही थक्क झाली आहे. याविषयी पूजाला लोकमत सीएनएक्सने विचारले असता, पूजा म्हणाली, ‘‘मला खूप काही सांगायचे, पण ते प्रत्यक्ष शब्दांत व्यक्त करता येत नाही. तसेच मायबाप प्रेक्षकांचे हे प्रेम पाहता माझ्यावर अधिक जबाबदारी वाढली आहे. माझ्या पोश्टर बॉईज व दगडी चाळ या दोन चित्रपटांमुळेच आज रसिकांच्या मनात मी जागा निर्माण करू शकले.’’ त्यांच्या या प्रेमाला एवढेच सांगू शकते, की बॉटम हार्ट टू थँक्स. तसेच चाहत्यांना प्रॉमिस करते, की तुमचा हा विश्वास कधीही तोडणार नाही. एक कलाकार म्हणून तुमचं मनोरंजन करून माझं कर्तव्य पार पाडेल. असो, तुझे फॉलोअर्सदेखील मन धागा धागा जोडत करोंडोचा टप्पा पार पाडो यासाठी तुला लोकमत सीएनएक्स च्यावतीने खूप शुभेच्छा.